जर तुम्ही एखादी मालमत्ता भाड्याने घेणार असाल किंवा देणार असाल तर ‘भाडे करार’ अवश्य करा. या करारनाम्यात भाडेकरू व मालक दोघांचे हित असते. कारण, मालमत्तेच्या बाबतीत कोणताही व्यवहार ‘विनाकरार’ करणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते. म्हणून व्यवहारात भाडे कराराची औपचारिकता वगळू नये. तसेच, भाडे करारनामा म्हणजे काय ( what is rent agreement in marathi ) , याची तुम्हांला माहिती असणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी भाड्याने देण्या-घेण्याच्या व्यवहारात भाडेकरू व घरमालक यांच्यात सर्व अटी व नियमांसंबंधी जो करार केला जातो, त्याला भाडे करारनामा असे म्हणतात. भाडे करारनामा नमुना मराठी ( rent agreement format in marathi) यामध्ये ठरवलेले भाडे, सुरक्षा रक्कम, कराराची मुदत किंवा कालावधी, राहण्याबद्दल किंवा कोणतीही वस्तू व सुविधा वापरण्याबद्दलचे नियम, इत्यादी सगळ्या बाबी नमूद असतात. कमी-अधिक बाबींच्या अंतर्भावाने काही भाडे करारांचे स्वरूप गरजेनुसार वेगळेसुद्धा असू शकते. नो ब्रोकर प्रोफेशनल रेंट एग्रीमेंट सर्विसेस् तुम्हांला भाडे करारनाम्याबाबत आवश्यक ते साहाय्य करतील
उपरोक्त सर्व नियम व अटींच्या नोंदी भाडे करारात असतात. घरमालक व भाडेकरू दोघांच्या स्वाक्षऱ्यांनी ते करार संमत होते. दोघांपैकी एक किंवा दोघेही संबंधित करारनाम्याचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, उदाहरणार्थ; घरमालकाने अधिकची रक्कम आकारणे, भाडेकरूने सोई-सुविधांचा गैरवापर करणे, दोघांत सतत वाद होणे, इत्यादी. त्याचप्रमाणे, हा भाडे करारनामा भाडेकरू किंवा घरमालकावर जर चुकीचा दावा दाखल झाल्यास त्यांचे रक्षणही करतो.